अमळनेर सुवर्णकार युनियनच्या अध्यक्षपदी भामरे

0

अमळनेर। येथील आहिर सूवर्णकार यूनियनच्या अध्यक्षपदी जितेंद्र अमृत भामरे तर उपाध्यक्ष राजेंद्र पोतदार, सचिव म्हणून निलेश देवपूरकर यांची सर्वानूमते नुकतेच विश्वस्त मंडळाच्या बैठकीत निवड घोषीत करण्यात आली. सूवर्णकार यूनियनच्या विश्वस्तांची तीन वर्षांसाठी निवड झाली. असून मावळते अध्यक्ष रमेश पिंगळे व त्यांच्या सहकार्‍यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने सर्व पदाधिकारींची आजच्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली. त्यात सहसचिव म्हणून आनंद दूसाने व भूवन प्रमूख म्हणून राजू दाभाडे यांची निवड करण्यात आली.

प्रभारी अध्यक्ष मोहन भामरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक खेळीमेळीत पार पडली. सभेचे कामकाज प्रभारी सचिव संजय विसपूते यांनी काम पाहीले. यावेळी मनिष विसपूते, राजू दूसाने, कैलास विसपूते, बाळासाहेब दूसाने, सूनिल सोनार हे विश्वस्त उपस्थित होते. समाजाच्या वास्तूचे नूतनिकरण हा विषय मार्गी लावण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे मंडळाच्या बैठकीत सर्वानूमते निश्चित करण्यात आले.