सोमाटणे : शारदाश्रमचे शिक्षक अमित उर्फ आप्पा नारायण वावरे यांना महाराष्ट्र राज्य स्वराज्य शिक्षक संघाने आदर्श शिक्षक पुरस्काराने नुकतेच सन्मानीत केले. शिक्षक आमदार विक्रम काळे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, शिव छत्रपती पुरस्कार विजेते स्वप्निल ढमढेरे, सुवर्ण पदक विजेते रोहित चव्हाण, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, उत्तम फडतरे, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, वीरसिंह रणसिंग, संभाजी होळकर यावेळी उपस्थित होते. राज्य गुणवंत प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींना सन्मानचिन्ह, प्रशस्ती पत्रक, गुलाब पुष्प आणि उकृष्ट कार्य गौरवाचा फेटा बांधून बारामती येथे सन्मानीत करण्यात आले.