नवी दिल्ली: भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी देशभरात प्रार्थना केली जात आहे. राजकीय नेते मंडळी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी परमेश्वराला साकडे घालत आहेत. दरम्यान त्यांचे राजकीय विरोधक मानले जाणारे अमित शहा यांच्यावर सातत्याने टीकास्त्र सोडणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी सदिच्छा व्यक्त केली आहे. एरवी राजकारणात पक्के वैरी मानले जाणारे नेते वैयक्तिक आयुष्यात एकमेकांबद्दल आदर ठेवतात हे यातून स्पष्ट झाले आहे. गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष करण्याची एकही संधी राहुल गांधी सोडत नाहीत, मात्र आज त्यांनी ट्विटकरून अमित शहा यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे.
Wishing Mr Amit Shah a speedy recovery.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 2, 2020