BREAKING: अमित शहांच्या प्रकृतीत बिघाड; एम्समध्ये दाखल

0

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र ते यातून बरे झाले असून त्यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज देखील देण्यात आला. मात्र त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्लीतील एम्समध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अंगदुखीमुळे अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत असल्याची माहिती समोर येत आहे. 2 ऑगस्टला त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तर उपचारानंतर 14 ऑगस्टला अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर कोरोनावरील उपचार करण्यात आले होते.

एम्सने दिलेल्या माहितीनुसार अमित शहांना कोरोनानंतरच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चांगली असून त्याचे कामही ते हॉस्पिटलमधून करत आहेत. शहा यांना थकवा आणि अंगदुखी होत होती. एम्समध्ये डॉ. रणदीप गुलेरियां यांची टीम अमित शहांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. शहा यांना मध्यरात्री 2 वाजता हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.