अमिषा पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर

0

मुंबई : ‘काहो ना प्यार हैं’ चित्रपटातून प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री अमिषा पटेलने या चित्रपटुन प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. सध्या ती चित्रपटातून गायबच झाली आहे. मात्र, ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

आमिषा नेहमी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. आता मात्र अमिषाला इन्स्टाग्रामवर फोटो अपलोड करणे महागात पडले आहे. ट्रोलर्सनी तिच्यावर निशाणा साधला असून ‘आता तू म्हातारी झाली आहेस’, अशी प्रतिक्रिया दिली.