जळगाव : महानगरपालिकेला अमृतमधून पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. त्यामुळे शहरात जलवाहीन्यांसाठी रस्ते खोदावे लागणार आहे. रस्ते खोदावे लागणार असल्याने 10 कोटीच्या निधीतून मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामांना देखील ब्रेक लागला आहे. ही कामे सुरु करण्यास हरकत नसल्याने महापौर नितिन लढ्ढा यांनी आयुक्तांनकडे पाठपुरावा करणार असल्याची माहीती आज दिली.
जलवाहीन्यांची नवीन वितरण व्यवस्था
शहराचा अमृत योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यातून पाणीपुरवठा योजनेस मंजूरी मिळाली आहे. यात जलवाहीन्यांची नवीन वितरण व्यवस्था करण्यात येणार आहे. शासनाला सादर केलेल्या पाणीपुरवठा याजेनेचा 400 कोटी रुपयांचा प्रस्ताव स्विकारून जळगाव महापालिकेचा अमृत योजनेत समावेश केला. योजनेसाठी पहिल्या टप्प्यात जळगाव महापालिकेला 124 कोटी रुपयांचे अनदान मंजूर केले आहे.
मुख्यमंत्री निधीबाबत संभ्रम
अमृत योजनेच्या पहील्या टप्प्यातील निविदाप्रकीया सुरु करण्यात आली आहे. जलवाहीन्या टाकण्यासाठी रस्ते खोदावे लागणार असल्याने महापालिकेने आता नविन रस्त्यांची कामे करु नयेत असे आदेश नुकतेच विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी दिले आहेत. त्यामुळे महापालिकेला मुख्यमंत्री यांच्याकडून मिळालेल्या 25 कोटी रुपयांच्या निधीतील रस्त्यांच्या कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता तर 10 कोटीतील रस्त्यांची कामे देखील आयुक्तांनी थांबविल्याने खळबळ उडाली आहे.