हांगझाऊ: अमेरिका आणि चीन या देशातील व्यापार युद्ध अजून अनेक वर्षे चालत राहणार, असा इशारा ‘अलिबाबा’ या चीनच्या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक जॅक मा यांनी दिला आहे. चीनमधील हांगझाऊ येथे गुंतवणूकदारांच्या परिषदेत ते बोलत होते.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीनच्या २०० अब्ज डॉलर्सच्या उत्पादनांवर अमेरिकेने १० टक्के कर आकारण्याचा निर्णय येण्याच्या काही तासाआधी जॅक मा यांनी हे वक्तव्य केले आहे. येत्या काही काळात अमेरिका व चीनमधील व्यावसाईक अडचणीत येण्याची शक्यता आहे. हे व्यापारी युद्ध २० दिवस किंवा २० महिन्यांसाठी नसून २० वर्षांसाठी असणार आहे, असे जॅक मा म्हणाले.
चीनने अमेरिकेच्या वस्तूंवर स्वतःचा दर लागू करुन प्रतिशोध घेतला, तर अमेरिकाही चीनी वस्तूंवर अंदाजे २६७ अब्ज डॉलर्सच्या शुल्काची आकारणी करेल, अशी धमकी ट्रम्प प्रशासनाने दिली आहे.