न्यूयॉर्क – करोना व्हायरसने जगभर थैमान घातले आहे. जगात करोनाच्या बळींची संख्या ४२ हजारांवर गेली आहे. तर ८ लाखांहून अधिक जण करोना पॉझिटिव्ह आहेत. एकट्या अमेरिकेत करोनाच्या रुग्णांची संख्या १ लाख ७४ हजारांवर गेली आहे. ४२ हजार मृतांपैकी २९, ३०५ हे युरोपातील आहे. अमेरिकेत काल एका दिवसात ८६५ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत ३८६० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीत अमेरिका इटली आणि स्पेननंतर तिसर्या स्थानावर पोहोचली आहे.
अमेरिका आणि यूरोपमध्ये कोरोनाचे थैमान सुरूच असून, जगभरातही कोरोनाबधितांचा आकडा सातत्याने वाढत चालला आहे. कोरोनाच्या वाढत्या फैलावासमोर अमेरिका आणि यूरोपीय देश हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. इटली आणि स्पेनमध्ये करोनाचे तांडव सुरू आहे. अमेरिकेत करोना व्हायरसने मृतांची संख्या वाढली असून चीनलाही मागे टाकले आहे. चीनमध्ये करोनाने ३३०९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अमेरिकेत करोनाने ३,४१५ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील गेल्या शतकातील नैसर्गिक आपत्तीतील मृतांची ही सर्वांत मोठी संख्या आहे. इटलीतील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही एक लाखाच्यावर गेली आहे. तर स्पेनमध्ये करोनाच्या रुग्णांच्या आकडा लाखाजवळ पोहोचला आहे.
करोना व्हायरसने मंगळवारी ब्रिटनमध्ये ३८१ जणांचा मृत्यू झाला. करोनाने होणार्या मृत्यूंचा एक दिवसातला हा सर्वात मोठा आकडा आहे. इराणमध्येही मंगळवारी करोनाने १४१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे इराणमधील मृतांची एकूण संख्या २,८९८ इतकी झाली आहे. इराणमध्ये आणखी ३१११ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे इराणमधील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४४, ६०६ इतकी झाली आहे.
Next Post