अमोदा शिवारात नदीपात्रातील गावठी अड्डयावर छापा

0

पहाटे 6 वाजताच तालुका पोलिसांची कारवाई
8 हजार 650 रुपयांचा ऐवज जप्त

जळगाव- तालुक्यातील अमोदा शिवारात गिरणापात्रातील गावठी अड्डयावर तालुका पोलिसांनी कारवाई करुन संशयितासह 8 हजार 650 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. मंगळवारी पहाटे 6 वाजेच्या सुमारास पोलीस निरिक्षकांसह पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरिक्षक भागवत पाटील यांना अमोदा शिवारातील नदीपात्रात गावठी दारु तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरिक्षक बी.डी.पाटील, विजय दुसाने, दिपक कोळी यांच्या पथकासह मंगळवारी सकाळी छापा टाकला व दोन ड्रम मधील 400 लिीटर गुळमिश्रीत तर 35 लीटर तयार गावठी दारु यांच्यासह 8 हजार 650 रुपयांची गावठी दारु जप्त केली. पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल्ल धांडे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करुन दशरथ मानसिंग भिल रा. अमोदा याविरोधात ताब्यात घेतले आहे.