अयोध्यानगरात 36 वर्षीय व्यक्तीचा गळफास

0

जळगाव । शहरातील आयोध्यानगरात राहणार्‍या 36 वर्षीय व्यक्तीने घरात कोणीही नसतांना छताला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सकाळी सात वाजेच्या सुमारास शेजारी राहणार्‍या रहिवाश्यांच्या लक्षात आल्याने त्यांना तात्काळ एमआयडीसी पोलिसांना कळविले. त्यानुसार एमआयडीसी पोलिसा आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनोज वसंत पाटील (वय-36) अयोध्या नगर मु.राहणार खंडाळा ता.भुसावळ येथील रहिवाशी असून गेल्या 10 वर्षापासून जळगावात वास्तव्यास आहे. हे रेल्वे स्थानकाजवळील मालधक्क्यावर कामास असून त्यांनी नेहमी प्रमाणे कामावरून घरी गेले. त्यांची पत्नी व दोन मुली घरी नसल्याने ते घरात एकटेच होते. त्याची पत्नी गेल्या दोन दिवसांपासून गावात राहणार्‍या आईवडीलांकडे माहेरी गेल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास बंद घरात छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतली. सकाळी उशिरपर्यंत घरातून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेजारी राहणार्‍यांना संशय आल्याने घरात डोकावून पाहिले असता मनोज यांनी गळफास घेतल्याचे समोर आले. त्यानुसार एमआयडीसी पोलिसात घटनेची माहिती देण्यात आली.

आज अंत्यसंस्कार
घटनेची माहिती नातेवाईकांना देण्यात आली, मयत मनोज पाटील यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकिय अधिकारी डॉ. आकाश चौधरी यांनी मयत घोषीत केले. डॉ. आकाश चौधरी यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्‍चात पत्नी, 10 वर्षाचा मुलगा, 8 वर्षाची मुलगी आणि वडील आहेत. भुसावळ तालुक्यातील खंडाळा येथे त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.