दोन्ही शाळेत विविध उपक्रम राबविले
हे देखील वाचा
नवी सांगवी : अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि लिटल फ्लॉवर इंग्लिश व मराठी मिडीयम स्कूलमध्ये राष्ट्रभाषा हिंदी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून मुख्याध्यापिका हर्षा बाठिया उपस्थित होत्या. यावेळी सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, तेजल कोळसे-पाटील, भटू शिंदे आदी उपस्थित होते. प्रशालेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी यांनी कार्यक्रमासाठी परीश्रम घेतले.
यावेळी आठवीतील विद्यार्थीनींनी भरतनाट्यम् सादर करीत उत्स्फुर्त दाद मिळविली. सातवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांनी ग्रुप डान्स सादर केला. तर सहावीतील विद्यार्थ्यांनी कविता सादर करीत वाहवा मिळविली. विद्यार्थ्यांनी समुहगीत सादर केले. दरम्यान, शिक्षकांसाठी अंताक्षरी कार्यक्रम घेण्यात आला. पाचवी व सहावीतील विद्यार्थ्यांनी ‘विविधतेत एकता’ या विषयावर नाटिका सादर केली. हिंदी दिनाचे महत्त्व सांगणारी भाषणेही विद्यार्थ्यांनी केली. मुख्याध्यापिका हर्षा बाठिया यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना हिंदी दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनिषा पुराणिक यांनी केले. त्यांनी राष्ट्रभाषा हिंदी दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. ओंकार गदगे या विद्यार्थ्याने प्रमुख पाहुण्यांचा परिचय व आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आठवीतील वेदांत पाटील या विद्यार्थ्याने केले.