अरविंद केजरीवाल यांच्यासह ६ मंत्र्यांनी घेतली शपथ; जुन्याच मंत्र्यांना स्थान !

0

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत आम आदमी पक्षाने घवघवीत यश संपादन केले भाजप आणि कॉंग्रेसचा सुपडा साफ करत आम आदमी पक्ष तिसऱ्यांदा सत्तेत आली आहे. आज रविवारी १६ रोजी अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासह सहा मंत्र्यांना शपथ देण्यात आली. या नव्या मंत्रीमंडळात जुन्याच मंत्र्यांनी शपथ घेतली. यात मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, कैलाश गहलोत, इमरान हुसैन, राजैन्द्र पाल गौतम यांचा समावेश आहे. गोपाल राय यांना परिवहन, कैलाश गहलोत यांना गृहमंत्री आणि इतर महत्वाचे खाते, राजैन्द्र पाल गौतम यांनी पाणीपुरवठा आणि पर्यावरण सारखे खाते तर इमरान हुसैन यांच्याकडे अन्न पुरवठा मंत्री पदाची जवाबदारी देण्यात आली होती.

आपच्या नवीन मंत्रीमंडळात नवीन चेहऱ्यांचा समावेश होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र दिल्ली विधानसभेत जुन्या मंत्र्यांनी पुन्हा एकदा मंत्रीपदाची शपथ घेतली.