दिघी : हॉटेल बंद करण्रास सांगितल्राच्रा राग आल्याने हॉटेल चालकाने पोलिसांना अपशब्द वापरून धक्काबुक्की केली. हा प्रकार बुधवारी (दि. 5) पहाटे अडीचच्रा सुमारास देहू फाटा रेथील इंद्रारणी हॉटेलसमोर घडला. याप्रकरणी पोलिसांनी अरेरावी करणार्या हॉटेल चालकास अटक केली आहे. रोहिदास बबन कदम (वर 51, रा. देहूफाटा, आळंदी), असे अटक करण्रात आलेल्रा हॉटेल चालकाचे नाव आहे. या प्रकरणी दिघी पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक आर. घाडगे रांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रस्त्यावर येऊन आरडा-ओरडा
पोलिसांनी दिलेल्रा माहितीनुसार, बुधवारी रात्री पोलीस उपनिरीक्षक घाडगे आणि त्रांचे सहकारी हद्दीत गस्त घालत होते. रात्री एक वाजता रोहिदास कदम रांचे हॉटेल सुरू होते. त्रांना पोलिसांनी हॉटेल बंद करण्रास सांगितले. परंतु पोलीस निघून गेल्रानंतर कदम यांनी पुन्हा हॉटेल सुरू ठेवले. रात्री अडीच्रा सुमारास घाडगे रांना हॉटेल सुरू असल्राचे दिसून आले. त्रावेळी त्रांनी कदम यांना हॉटेल बंद करण्रास सांगितले. परंतु कदम रांनी रस्त्रावर रेऊन आरडा-ओरडा करण्रास सुरुवात केली. तसेच घाडगे रांना अपशब्द वापरले. इतर पोलीस त्रांना समजवारला गेले असता त्रांना धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणल्राप्रकरणी त्रांना अटक करण्रात आली. नंतर त्यांची न्यायालयाकडून जामिनावर सुटका झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक शरद आहेर तपास करीत आहेत.