अर्जुन चमकला

0

मुंबई । अर्जुन कावळेने केलेल्या सहा गोलांच्या जोरावर बलाढ्य पश्‍चिम रेल्वेने बृहन्मुंबई जलतरण संघटनेच्या पाच संघाच्या वॉटरपोलो लीगमध्ये पोलिस स्विमिंग पुल संघाचा 15-7 असा दणदणित पराभव केला. श्रेयस वैद्यने तीन, अक्षय आणि अश्‍विन कुंडेने प्रत्येकी दोन गोल करत अर्जुनला चांगली साथ दिली. पराभूत संघाकडून अभिजित मोकाशीने सर्वाधिक तीन गोल केले. या स्पर्धेचे आयोजन पी.एम.हिंदू बाथ तर्फे करण्यात आले आहे.