अर्जुन-मलायका पुन्हा एकदा एकत्र दिसले

0

मुंबई : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या अफेअरच्या चर्चा बऱ्याच होत आहेत. याचपाठोपाठ दोघेही पुढच्या वर्षी लग्न करणार असल्याच्याही चर्चा सुरू आहे. अशातच दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले आहे.

अर्जुन आणि मलायका यांना मुंबईतील बांद्रा येथील एका रेस्टॉरंन्टजवळ एकत्र स्पॉट करण्यात आले. येथे दोघेही डिनरच्या निमित्ताने भेटले होते. काही दिवसांपूर्वीच मलायका आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी इटलीमध्ये गेली होती. तेथील एका फोटोत मलायका अर्जुन कपूरसोबत असल्याचे दिसून आले.