मुक्ताईनगर। कोणत्याही क्षेत्रात अर्थशास्त्राला अनन्य साधारण महत्व आहे. ज्यात अर्थशास्त्र नाही त्याला अर्थच नसल्याचे समजले जाते. त्यामुळे देशाला सर्वांगिण प्रगती साध्य करण्यासाठी अर्थशास्त्र विषयाला प्राधान्य देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. आर.एच. गुप्ता यांनी केले. येथील संत मुक्ताबाई कला, वाणिज्य महाविद्यालयात एमए अर्थशास्त्र भाग 1 व 2 या विषयाची अभ्यासक्रम पुनर्रचना संबंधित उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्तरावरील कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.
दोन सत्रात घेण्यात आली कार्यशाळा
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर.एच गुप्ता होते. तर उद्घाटक म्हणून जळगाव येथील एम.जे. महाविद्यालयाचे प्रा. एस.डी. जोशी होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रमुख उपस्थितांमध्ये शशिकांत कुलकर्णी, व्ही.डी. पाटील हे उपस्थित होते. दोन सत्रात झालेल्या कार्यशाळेत विविध महाविद्यालयातील प्राध्यापकांनी एमए अर्थशास्त्र भाग 1 व 2 वरील अभ्यासक्रमासंदर्भात विस्तृत चर्चा करत मते नोंदवली. यामध्ये जुन्या अभ्यासक्रमात असलेल्या काही तृटी प्राध्यापकांनी मांडल्या. तसेच यावर काही फेरबदल करण्यसंदर्भात चर्चादेखील करण्यात आली. कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी चोपडा महाविद्यालयाचे प्रा. एस.के. पाटील उपस्थित होते तर प्रमाणपत्रांचे वितरण व्ही.डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. बी.एल. महाजन यांनी तर आभार प्रा. आर.एल. कच्छवा यांनी मानले.