अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग- रवींद्रभैय्या पाटील

0

जळगाव- विद्यमान सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प होता, त्यामुळे यातून फार मोठ्या अपेक्षा होत्या, झालेल्या घोषणांची कितपत अमलबजावणी होईल, हा प्रश्न असून शेतकाऱ्यांचा मात्र या अर्थसंकल्पातुन अपेक्षा भंग झाला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे जिल्हाधक्ष्य रवींद्रभैया पाटील यांनी दिली आहे. दुष्काळासाठी पाहिजे तशी तरतूद नाही, शिवाय शेतीमाल, उत्पादित संस्था यांच्यासाठीही सरकारने काही विशेष तरतूद केलेली नसल्याचे रवींद्र पाटील यांनी सांगितले. दरम्यान बोदवड उपसा सिंचन योजना ताब्यात घेण्यासंदर्भात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.