अर्थसंकल्पातून सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न!

0

जळगाव । रेल्वे प्रशासन आणि केंद्र सरकारने संयुक्त रित्या अर्थसंकल्प सादर करण्याची पहिलीच वेळ आहे. आगामी काळात निवडणुका होत असल्याने सर्वसामान्यांचा या अर्थसंकल्पाकडे विशेष लक्ष लागुन होता. निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन सत्ताधारींनी सामान्यांना खुष करण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी, शेतमजुर, तरुण, महिला, दलित, अल्पसंख्याक, उद्योजक, करदाते, बिल्डर्स अशा सर्वच घटकांना खुष करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेसाठी आजपर्यतची सर्वाधिक निधीची तरतुद करण्यात आली आहे. 48 हजार कोटी निधींचा तरतुद करण्याची पहिलीच वेळ आहे. मात्र याची अंमलबजावणी किती प्रमाणात होते हे विशेष. कारण ग्रामीण भागात याची योग्यरित्या होत नसल्याचे आतापर्यत दिसुन आले आहे. ‘जेण्डर बजेट’ नावाच्या संकल्पनेचं या अर्थसंकल्पाला पुर्णत: विस्मरण झालेलं दिसतं . युवा, शिक्षण, कौशल्यविकास, ग्रामविकास या संकल्पनांवर भर देताना त्यात महिलांसाठी काहीही विशेष तरतूदींचा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आलेला नाही. महिलेच्या नावानं एलपीजी कनेक्शन देणं, गर्भवती महिलेच्या खात्यात सहा हजार रुपये जमा करणं, मेक इन इंडियामध्ये अनुसुचित जाती जमातींसह महिलांना सवलती देण्यात आली आहे याचे सर्वस्तरातुन स्वागत हात आहे.

सामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातुन झालेला आहे. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कर प्रणाली सुटसुटीत करण्यात आली आहे आणि करवाढीसाठी चांगला प्रयत्न आहे. अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार रोजगार वाढीला चालना मिळणार आहे.
सामान्य जनतेच्या भल्यासाठी हा अर्थसंकल्प आहे.
-एकनाथराव खडसे- माजी महसुलमंत्री

नोटाबंदीमुळे सरकारला झालेल्या फायद्यातुन मध्यमवर्गीयांना तीन लाखापर्यतच्या उत्पन्नाच्याकरातुन सुट देण्यात आली आहे. हा अर्थसंकल्प शेतकरी, शेतमजुर, तरुणांसाठी उपयुक्त आहे. महिलांसाठी या अर्थसकल्पात विशेष तरतुद आहे. रोजगार वाढीसाठी केंद्र शासनाने प्रयत्न केले आहे. हा सकरात्मक अर्थसंकल्प आहे.
-रक्षा खडसे-खासदार रावेर मतदारसंघ

1924 नंतर पहिल्यांदाच रेल्वे आणि केंद्रीय अर्थसंकल्प संयुक्तरित्या सादर झाला आहे. ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहे. टॅक्सवाढीसाठी प्रयत्न झालेला आहे. कृषी संशोधनाला वाव मिळावा यासाठी 1 हजार संशोधन केंद्रे निर्माण करण्यात येणार आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेसाठी इतिहासातील सर्वाधिक तरतुद करण्यात आली आहे.
-ए.टी.पाटील,खासदार जळगाव लोकसभा मतदारसंघ

निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन फसव्या, भ्रामक आशा पल्लवीत करण्यात आले आहे. जनतेचा दिशाभुल करणारा हा अर्थसंकल्प आहे. निवडणुकाडोळ्यासमोर असल्याने मत घेण्यासाठी घेतलेला निर्णय पचण्यासारखे नाही. निवडणुकीत याचा परिणाम दिसेलच. जनतेची फसवणुक करणारा अर्थसंकल्प आहे.
-सतिष पाटील,आमदार राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हाध्यक्ष

या अर्थसंकल्पातुन केवळ आश्‍वासनाचा पाऊस पाडण्यात आलेला आहे. कोणताही ठोस निर्णया यातुन घेण्यात आलेला नाही. प्रामाणिकपणे कर भरणार्‍यांना अर्थसंकल्पाच्या माध्यमातून काहीच फायदा झाला नाही. गुंतवणुकीची मर्यादा वाढवायला पाहिजे होती ती वाढविली गेली नसल्याने उद्योग धंदे वाढणार नाही. संपुर्ण अर्थसंकल्प निराशाजनकच आहे. यातुन काहीच साध्य झाले नाही.
-डॉ. उल्हास पाटील-माजी खासदार

‘गावाचा विकास तर प्रदेशाचा विकास’ हा ध्यास शासनाने घेतला असल्याने या अर्थसंकल्पात गावविकासावर भर देण्यात आला आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकर्‍यांपासुन तर इंटरनेटच्या जमान्यातील नागरिकांना सामावुन घेण्यात आले आहे. सर्व समावेशक असा हा अर्थसंकल्प आहे. नोटाबंदीनंतर भ्रष्टाचार कमी करण्याचा खर्‍या अर्थाने अर्थसंकल्पातून प्रयत्न झाला आहे.

-उदय वाघ, भाजपा जिल्हाध्यक्ष

अतिशय निराशाजनक असा हा अर्थसंकल्प आहे. शेतकरी, शेतमजुर ग्रामीण भागासाठी ठोस उपाय नाही. दुरदृष्टी नसलेला आणि अर्थहीन अर्थसंकल्प आहे. नोटाबंदीच्या माध्यमातून काय साध्य केले हे स्पष्ट करण्यात आलेले नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे.
-संदिप पाटील,कॉग्रेस जिल्हाध्यक्ष

अतिशय निराशाजनक असा हा अर्थसंकल्प आहे. शेतकरी, शेतमजुर ग्रामीण भागासाठी ठोस उपाय नाही. दुरदृष्टी नसलेला आणि अर्थहीन अर्थसंकल्प आहे. नोटाबंदीच्या माध्यमातून काय साध्य केले हे स्पष्ट करण्यात आलेले नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे.
-संदिप पाटील,कॉग्रेस जिल्हाध्यक्ष

अर्थसंकल्पात करमर्यादा वाढविण्यात आल्याने परकीय गुंतवणूक वाढणार आहे. बांधकाम व्यवसायाला पायाभुत दर्जा दिल्यामुळे घर बांधणे सोपे होणार आहे. रियल इस्टेट सेक्टरलाही तेजी या अर्थसंकल्पामुळे येईल. सामान्यांचा घर बांधण्याचा स्वप्न पुर्ण होईल. बँकिग क्षेत्राच्या विशेष तरतुदीमुळे बँकीग क्षेत्रात नफा वाढणार आहे.
– संदीप पाटील,शेअर ब्रोकर्स

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतुद केली आहे. दुध प्रक्रिया उद्योगांसाठीही 8 हजार कोटीची तरतुद ही दुध उत्पादक शेतकर्‍यांसाठी निश्‍चीतपणे आनंददायी बाब आहे. पीकविम्यासाठी 9 हजार कोटीची तरतुद करण्यात आली आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी 3 लाख कोटीची तरतुद करण्यात आली आहे. रेल्वेच्या विकासासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. -आमदार किशोर पाटील, पाचोरा.

कॅशलेस व्यवहार वाढीसाठी शासनाकडुन अधिक प्रयत्न करण्यात येत आहे. ही चांगली बाब आहे मात्र कॅशलेस व्यवहारासाठी के्रडिट, डेबीट कार्ड वापरावरील चार्ज कमी करायला पाहिजे. सर्वसामान्यांना हा खर्च परवडणारा नाही. चार्ज कमी झाल्यास कॅशलेस व्यवहार वाढतील. कॅशलेस व्यवहार पूर्णपणे निशुल्क झाले पाहिजेत. अर्थसंकल्पात याविषयी काहीच चर्चा नाही. दरम्यान व्यापारवाढीसाठी वातावरण निर्मिती करण्यात आली आहे.
-प्रविण पगारिया

अर्थसंकल्प चांगला आहे. मात्र प्राप्तिकराची मर्यादा वाढविली पहिजे होती. उद्योग धंदे वाढत असल्याने तीन लाखापर्यत कमविणे काही विशेष झाले नसल्याने प्राप्तीकराची मर्यादा वाढविली पाहिजे होती. नोटाबंदीच्या निर्णयाचा फायदा अर्थसंकल्पाच्या माध्यमातून झालेला आहे.
-अनिल कांकरिया

शेती आणि शेतकरी केंद्रबिंदू असणारा अर्थसंकल्प अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकर्‍यांसाठी खुप काही देण्याचा प्रयत्न केला आहे. सिंचनक्षेत्र वाढविण्यासाठी ठिंबक सिंचनाचे मोठे दालन निर्माण करण्यात आले आहे. सुक्ष्म सिंचनामुळे पाणी संपत्तीचा विनयोग योग्य प्रकारे होईल आणि उत्पन्न दुप्पट वाढेल यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहे. मनरेगा योजनेतील भरीव वाढ अर्थव्यवस्थेमध्ये खुप परिणामकारक ठरणार आहे. लघु उद्योगांना कर सवलत देण्यात आली.
-अशोक जैन, अध्यक्ष जैन

विद्यमान अर्थमंत्री अरुण जेटली विरोधी पक्षात असतांना त्यांनी करप्राप्त उत्पन्नाची मर्यादा पाच लाखापर्यत वाढविण्याची मागणी केली होती. परंतु आता स्वतः अर्थमंत्री असतांना का केले नाही? मनरेगावर उपहासात्मक टिका करणारे मनरेगासाठी विशेष तरतुद करतात. कॉग्रेसने तरतुद केलेल्या योजनांचाच या अर्थसंकल्पात कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थसंकल्पातुन महागाई कमी होण्याची चिन्हे दिसत नाही.
-राधेश्याम चौधरी,महानगराध्यक्ष कॉग्रेस

अर्थमंत्री जेटलींनी शेतकरी केंद्रबिंदु मानुन त्यांच्यासाठी भरवी तरतुदी केल्या आहे. तरतुदीच्या माध्यमातून शेतकर्‍यांपर्यत पैसा पोहचावा यातच शेतकर्‍यांना आनंद आहे. रोजगार, रेल्वे, ग्रामविकासाच्या दृष्टीने अर्थसंकल्प दिलासा देणारा आहे. मात्र दिलेल्या आश्‍वसनाची योग्य तरतुद व्हायला हवी एवढीच अपेक्षा आहे.
– चंद्रकांत सोनवणे- आमदार शिवसेना

व्यापारी वर्गाच्या दृष्टीकोनातुन अतिशय चांगले निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आलेले आहे. हा अर्थसंकल्प व्यापार वाढीसाठी महत्त्वपुर्ण ठरणार आहे. सर्वसामान्य जनतेचा विचार यामाध्यमातून झालेला आहे. नव उद्योगांना चालना मिळावी यासाठी विशेष तरतुद असल्याने उद्योग धंदे निश्‍चितच वाढणार आहे. कर सवलत वाढल्याने लघुउद्योग वाढतील.
-युसुफ मकरा,व्यापारी