अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले

0
पावसाळी अधिवेशन ४ जुलै पासून 
मुंबई:  राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ फेब्रुवारी पासून मुंबई येथील विधानभवनात सुरु झालेल्या अधिवेशनाचे सूप बुधवारी वाजले. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात झालेल्या कामकाजाचा आढावा घेत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सदर अधिवेशन संस्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली. त्याच बरोबर पुढील पावसाळी अधिवेशन येत्या ४ जुलै पासून होणार असल्याचे यावेळी विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केले.
अधिवेशन संस्थगित करण्याआधी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी एकून झालेले कामकाजाची माहिती दिली. त्यानुसार अधिवेशन कालावधीत ऐकून २२ बैठका झाल्या असून १८२ तास कामकाज झाले आहे. विविध कारणामुळे १० तास तर मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे १० मिनिट कामकाज झाले असल्याचे नमूद केले. सरासरी कामकाज ७ तास ४६ मिनिट झाले असून एकूण तारांकित प्रश्न ११६५७ प्राप्त झाले. त्यापैकी १००५ स्विकारण्यात आले असून ७० प्रश्नांची तोंडी उत्तर देण्यात आली. अल्प सूचना २३ प्राप्त झाल्या असून त्यापैकी १ सूचना चर्चेला आली असल्याचे यावेळी सांगितले. लक्षवेधी सूचना ३३० प्राप्त झाल्या असून ११७ स्विकारण्यात आल्या  असून ४९ चर्चिल्या गेल्या आहे.एकूण १३ विधेयके दोन्ही सभागृहाने मंजूर केले असून अर्धातास चर्चेच्या १४७ सूचना प्राप्त झाल्या असून ६ वर चर्चा झाली असल्याचे यावेळी विधानसभा अध्यक्षांनी सभागृहात सांगितले. अधिवेशन कालावधीत सदस्यांची एकूण सरासरी उपस्थिती ७९.६ टक्के तर कमीत कमी ५८.२० टक्के असल्याचे यावेळी सांगितले.