नवी दिल्ली: उद्या ३१ जानेवारीपासून केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार आहे. तत्पूर्वी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलविण्यात आली होती. यात मोदींनी सर्व पक्षीय नेत्यांना अर्थसंकल्पीय अधिवेशन चर्चेतून शांततापूर्ण वातावरणात संपन्न होऊ देण्याबाबत आवाहन केले. अर्थसंकल्पात मांडण्यात येणाऱ्या महत्वाच्या विषयाबद्दल माहिती यावेळी देण्यात आली.