अर्थसंकल्प २०१९:छोट्या शेतकऱ्यांना मिळणार दरमहिन्याला पाचशे रुपये !

0

नवी दिल्ली-आज मोदी सरकारचा शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होत आहे. प्रभारी अर्थमंत्री पीयूष गोयल अर्थसंकल्प मांडत आहे. या अर्थसंकल्पात मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. छोट्या शेतकऱ्यांना दर महिन्याला ५०० रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचेही जाहीर करण्यात आले आहे. २ हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना ६ हजाराची मदत मिळणार आहे. १२ कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. १ डिसेंबर २०१८ पासून याची अंमलबजावणी होणार आहे.