जळगाव । कें द्र शासनाच्या सामाजिक अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांची बँक खाते त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न करा, असे निर्देश जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी जिल्हास्तरीय बँक समन्वय समितीच्या बैठकीत दिले. जिल्हास्तरीय बँक समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. जिल्हाधिकारी अग्रवाल यांनी जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय स्वस्तधान्य दुकानदारांना पीओएस मशिन्स देण्यासंदर्भात त्या-त्या बँकांनी कारवाई करावी, जेणे करुन चलनविरहित आर्थिक व्यवहाराला चालना देता येईल. यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा, अशी सुचनाही त्यांनी केली.
यांची होती उपस्थिती
जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, उपविभागीय पोलीस अधिकारी (प्रशिक्षणार्थी भापोसे) मनिष कलानिया, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, रिजर्व बँकेचे हेमंत दंडवते, नाबार्डचे जी.एम सोमवंशी, एच. के नाईक, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक एस.व्ही. दामले, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी विक्रांत बगाडे, विजया बँकेचे किशोरकुमार वर्मा, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था विशाल जाधवर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, सर्व बँकांचे शाखाधिकारी, तालुका कृषि अधिकारी व अन्य अधिकारी उपस्थित होते.
एकत्र येवून डाटा बँक तयार करा
जून ते ऑक्टोबर 2016 मधील अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकर्यांना द्यावयाच्या मदतीबाबत आढावा घेण्यात आला. तसेच पिक कर्ज वाटपाबाबत सर्व बँकनिहाय माहिती सादर करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी यावेळी सांगितले की, सर्व बँकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील मतदार यादीनिहाय खातेदारांची माहिती एकत्र करुन डाटा बँक तयार करण्याच्या सुचना संबंधितांना दिल्या. जेणे करुन योजनांचा लाभ थेट खात्यात वितरीत करतांना अडचण निर्माण होणार नाही.