अर्थे बु॥ येथे दि.28 पासून अखंड हरीनाम सप्ताह

0

शिरपूर। तालुक्यातील अर्थे बु॥ येथील तिरंगा चौकात दि.28 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन श्रीराम मंदिर ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येणार आहे.

28 रोजी ह.भ.प.रेखाताई बेडसे,चातुरीकर, दि.29 रोजी ह.भ.प.इंद्रायणीताई चौकटपाडा, दि.30 रोजी ह.भ.प.सुनिताताई सुर्यवंशी टाकळीकर, दि.31 रोजी ह.भ.प. अंजलीताई वासुदेव शिंदे, दि.1 एप्रिल रोजी ह.भ.प.शारदाताई सुर्यवंशी, दि.2 रोजी ह.भ.प.दिपिकाताई पाटील, दि.3 रोजी ह.भ.प.कंचनताई जगताप, दि.4 रोजी ह.भ.प.सुनिताताई पाटील यांचे रात्री 8 ते 11 यावेळेत किर्तन होणार आहे. तर दि.5 रोजी ह.भ.प. वनिताताई पाटील यांचे सकाळी 8 ते 11 यावेळेत काल्याचे किर्तन होवून महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीराम मंदिर ट्रस्ट व ग्रामस्थांनी केले आहे.