धुळे एसीबीची कारवाई ; टेंडरसाठी घेतली सात हजारांची लाच
धुळे:- शिरपूर तालुक्यातील अर्थ खुर्द आश्रमशाळेचा अधीक्षक सुनील शिवाजी खराटे (30) यास सात हजारांची लाच घेताना धुळे एसीबीने सेामवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली. आरोपी खराटेने शिरपूर येथील ठेकेदाराकडून पीठ दळून आणण्याच्या टेंडरचे बिल अदा करण्यासाठी लाचेची मागणी केल्याने तक्रार करण्यात आली होती. ही कारवाई धुळे एसीबीचे उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पावन पवन देसले व सहकार्यांनी केली.