अर्सेनेलने चेल्सीला नमवून जिंकला एफए चषक

0

लंडन । अर्सेनेलने अटीतटीच्या अंतिम सामन्यात बलाढय चेल्सीचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करून एफए फुटबॉल चषक पटकाविला. या स्पर्धेच्या चार हंगामात अर्सेनेल संघाने तिसर्‍यांदा एफए चषकावर आपले नाव कोरले. अर्सेनेल संघाने ही स्पर्धा विक्रमी 13 वेळा जिंकली आहे. अंतिम सामन्याला प्रारंभ झाल्यानंतर चौथ्याच मिनिटाला ऍलेक्सिस सांचेझने अर्सेनेलचे खाते उघडले. या सामन्यात सांचेझचा हा गोल वादग्रस्त ठरला. चेल्सीच्या खेळाडूंनी पंचांकडे ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यानंतर पंच टेलर यांनी सांचेझचा हा गोल नियमबाहय ठरविला. 79 व्या मिनिटाला रॅमसेने हेडरद्वारे गोल नोंदवून आपल्या संघाला एफए चषक मिळवून दिला.