वरखेडी । येथून जवळच असलेल्या लोहारी या गावी अलफलाह फाऊंडेशनतर्फे मोफत रक्तगट तपासणी शिबीर व शालेय गणवेश वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थांनी रंजना पाटील ह्या होत्या. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष संदीप पाटील, प्रवीण पाटील, मुरलीधर बडगुजर, सतीश पाटील, पाचोरा येथील शिबिरात रक्तगट तपासणीचे काम डॉ. मनिष अग्रवाल यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमालात लोहारी येथून जवळच असलेल्या वस्ती वरील जि.प. मराठी शाळेतील गरीब होतकरू मुलांना शालेय साहित्य गणवेश व शालेय साहित्यवाटप करण्यात आले. रक्तगट तपासणी मध्ये 310 तरुणांनी सहभाग घेवून रक्तगट तपासणी करण्यात आली.
रक्तगट तपासणीचे डॉक्टरांचे मार्गदर्शन
संस्थाचे अध्यक्ष मौलना जावेद, उपाध्यक्ष आयाज मो, सचिव एजाज मो यांच्यासह सदस्यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी डॉ.मनीष अग्रवाल यांनी आपाआपले रक्त गट स्वतला माहिती असणे किती आवश्क असून ते आपणास माहित असेल तर आपण तत्काळ कोणाला रक्ताची आवशकता असेल तर मदत करू शकतो व धावपळीच्या जिवनात रक्त गट माहिती असे आवश्यक झाले. आपल्या गावतील तरुणांनी आप-आपले रक्तगट तपासून एक अद्यायावद यादी ग्रुप वाईज तयार करून व्यायम शाळेत ठेवावी व वेळ गरजू रुग्णना मदत करावी, असे सांगितले.