अल्ट्रा सायकलिंग स्पर्धेत रनर्स ग्रुपच्या सदस्यांचा सहभाग

0

जळगाव । अथक परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर अशक्यप्राय अशा स्पर्धेतदेखील यश संपादन करता येते हे जळगाव रनर्स ग्रुपचे सदस्यांनी यांनी दाखवून दिले आहे. धुळे येथे रविवारी 16 जुलैला औडेक्स या संस्थेतर्फे धुळे सायकॅलिस्टनी भर पावसात आयोजित केलेल्या धुळे ते चांदवड आणि चांदवडहून परत धुळे अशा 200 कि.मी. अंतराच्या अल्ट्रासायकलिंग स्पर्धेत जळगावातील डॉ.रवी हिरानी, अ‍ॅड. सागर चित्रे आणि स्वप्निल मराठे या तीन सायकलपटूनी सहभाग नोंदविला होता.

अवघ्या 12 तासात अंतर पूर्ण
रविवारी सकाळी सहा वाजता ही स्पर्धा सुरु झाली. धुळे ते चांदवड आणि चांदवडहून परत धुळे असा या स्पर्धेचा मार्ग होता. स्पर्धेत सहभागी झालेल्या 29 सदस्यांना या 200 कि.मी. अंतरासाठी साडेतेरा तासांची वेळ देण्यात आली होती. उल्लेखनीय बाब म्हणजे स्पर्धा केवळ 12 तासात पूर्ण केली. त्यांनी याबाबत बोलतांना सांगितले की, रविवारी या परिसरात पाऊस आणि जोराचा वारा होता. त्यात महामार्ग असल्यामुळे समोरून येणार्‍या वाहनांचा, चढावाचाही प्रचंड त्रास होत होता. तरी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर या सर्वांनी पावसाची तमा न बाळगता केवळ 12 तासात ही स्पर्धा पूर्ण करीत यश मिळविले. अ‍ॅड. आनंद परांजपे, किरण बच्छाव, विक्रांत सराफ, निलेश भांडारकर, नरेंद्रसिंग सोलंकी, अविनाश काबरा यांचे मार्गदर्शन लाभले