अल्डेन, रश्मी ठरले वेगवान धावपटू

0

मुंबई। मुंबई उपनगर जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटना आयोजित जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी मैदानी स्पर्धेतील 20 वर्षे गटात सॅव्हियो स्पोर्ट्स क्लबचा अल्डेन नर्‍होना आणि गुप्ता स्पोर्ट्स अकादमीची रश्मी शेरेगर सर्वात वेगवान धावपटू ठरली. मुलांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत अल्डेनने 11. 2 सेकंद अशी वेळ नोंदवत पहिले स्थान मिळवले. अटीतटीच्या या शर्यतीत प्रबोधनचे साहिब सिंग आणि अखिलेश सिंग हे अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानावर राहिले. मुलींच्या शर्यतीत रश्मीने 12.2 सेकंद अशी वेळ नोंदवून पहिले स्थान मिळवले.

स्पर्धेतील निकाल
पुरुष : लांब उडी – हार्दिक शाह (यूनीव्हर्सल) 6:36 मीटर. 800 मीटर : लवकुश कनोजिया (रायझिंग स्टार) 2:06:1 सेकंद. मुले 20 वर्ष गट : 10000 मीटर : सौरभ भंडारी (गोयंका ट्रस्ट) 37:23:1 सेकंद. लांब उडी: अनील साबू (यूनीव्हर्सल) 6:87 मीटर. 800 मीटर : अतुल साळुंखे (साई) 1:55:8 सेकंद. मुले 18 वर्षाखालील : लांब उडी : मृणाल धनावडे (जेएस स्पोर्ट्स ).