महाळुंगे इंगळे । पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जाब विचारणार्या पीडित मुलीच्या मामा आणि मामीवर लोखंडी रॉडने हल्ला केल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. अक्षय हनुमंत कुर्हाडे (रा. भोसे) व त्याचा एक अनोळखी साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी पीडित मुलीच्या घरासमोर दोन युवक दुचाकीवरून आले. त्यातील अक्षयने संबंधित मुलीचा विनयभंग केला. याचा जाब संबंधित मुलीच्या मामाने आणि मामीने अक्षयला विचारला. त्याचा राग आल्याने अक्षय आणि त्याच्या अनोळखी साथीदाराने त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. चाकण पोलिस पुढील तपास करीत आहेत.