अल्पवयीन तरुणीवर अत्याचार ; सावखेडासीमच्या महिला आरोपीस अटक

0

यावल- सावखेडासीम येथील 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीला पळवून नेवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयीत आरोपी मीनाबाई जगदीश पाटील (सौखेडासीम) यांना रविवारी यावल पोलिसांनी अटक केली. संशयीत आरोपी प्रशांत उर्फ समाधान अशोक पाटील, अशोक ओंकार पाटील, संगीताबाई अशोक पाटील, मीनाबाई पाटील व समाधान पंडित पाटील यांनी पीडीत तरुणीला पळवून नेल्याने गुन्हा दाखल होता. प्रशांत पाटील या संशयीतास यापूर्वी अटक करण्यात आली होती तर अन्य पसार आरोपींचा शोध सुरू होता.