Rawer taluka shaken: Minor girl gang-raped : Crime Against Six People रावेर : जळगाव शहरातील एका भागातील रहिवासी व मूळची मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावातील असलेल्या अल्पवयीन तरुणीला रावेर तालुक्यात पळवून नेत सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रावेर पोलिसात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. नराधमांनी पीडीतेचा अत्याचारादरम्यान व्हिडिओ बनवला व तो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केला तसेच पीडीता त्यातून गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपातही करण्यात आल्याचा आरोप आहे.
पळवून नेत केला अत्याचार
या संदर्भात 17 वर्षीय पीडीतेच्या तक्रारीनुसार, 2 ते 19 जानेवारी 2022 दरम्यान संशयीत रवी छपरीबंद, आनंद बाविस्कर, सुजल छपरीबंद, गौरव जावे यांनी बलात्कार करण्याच्या उद्देशाने पळवून नेत पाल येथील निर्जनस्थळी आळी-पाळीने सामूहिक बलात्कार केला व नंतर रावेर येथे संशयीत आरोपी रवी छपरीबंद याने त्याच्या घरी डांबू ठेवले. याठिकाणी देखील चौघांनी पीडीतेवर वारंवार बलात्कार केल. तसेच चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच शिविगाळ करून अत्याचार करतानाचा व्हिडिओ बनवला.
व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
पीडीतेने संशयीतांच्या ताब्यातून स्वत:ची सुटका केल्यावरदेखील चौघा संशयीत आरोपींनी फोन करीत व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून अधुन-मधून बोलावलेल्या जागेवर पीडीतेवर अत्याचार केला. या अत्याचाराने पीडीतेला गर्भधारणा झाली तेव्हा तिने नाईलाजाने गोळ्या घेवून गर्भपात केला. यानंतर आलेली आपत्ती टाळण्यासाठी फिर्यादी पिडीतेच्या वडीलांनी तिचे लग्न कॅन्सरग्रस्त इसमासोबत लावून दिले. याप्रकरणी रवी छपरीबंद, आनंद बाविस्कर, सुजल, गौरव, रवी छपरीबंदची पत्नी आणि धीरज (सर्व. रा. रावेर) यांच्याविरुद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहेत.