अल्पवयीन तरूणीला पळविणार्‍या तरूणाच्या अटकेची मागणी

0

चाळीसगाव। लग्नाचे अमिष दाखऊन अल्पवयीन तरूणीला पळवून नेणार्‍या तरूणाला अटक न करता गुन्ह्यंला 50 दिवस उलटूनही तपास न लागल्याने 26 मे रोजी कुटूंबियांचा मेहरूणाबारे पोलीस स्टेशनसमोर आत्मदहनाचा इशारा पोलीस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. राजेंद्र नागो राजपूत व निर्मला राजेंद्र राजपूत यांनी बुधवार 24 मे रोजी पोलीस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राजेश्वरी हीचे 3 एप्रिल 2017 रोजी सकाळी 7.30 वाजेनंतर गिरणा शाळेतून गावातील मुस्लिम तरूण शेख शोहब याने लग्नाचे अमिष दाखवून अपहरण केले.

3 रोजी मेहुणबारे पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल करून संशयित म्हणून शेख शोहब शेख मकसुद व त्याच्या साथीदारांबाबत तक्रार केली. संशयित आरोपीची सपोनि शिरसाठ यांनी चौकशी केली. मुलीचे अपहरण झाल्याचे पोलीसांना सांगून देखील पोलीसांनी त्याला सोडून दिले. त्यानंतर तो फरार झाला. 5 रोजी त्याचे वडीलांवर गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची मागणी करून देखील पोलीस चौकशीत दिरंगाई करीत होते. आरोपिच्या आईने पिडीत मुलीला 3 व 4च्या रात्रीला डांबून ठेवल्याचे सांगितले होते. तसेच यातून आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न पोलीसांनी केल्याचे ताशेरे कोर्टने ओढले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तपासात दिरंगाई होत असल्याने तपास एलसीबीकडे द्यावा अशी मागणी केली. घटनेला 40 ते 50 दिवस उलटून देखील गुन्ह्यांचा तपास लागत नाही. 2 जून रोजी मुलीला 18 वर्ष पूर्ण होत असल्यानेच पोलीस तपासात दिरंगाई करीत असल्याचा आरोप पिडीत मुलीच्या कुटूंबियांकडू करण्यात येत आहे. 25 मे पर्यंत तपास लागला नाही तर 26 मेरोजी मेहुणबारे पोलीस स्टेशनला येऊन आत्महत्या करू असा इशारा त्यांनी दिला आहे.