जळगाव। शहरात लुटमार व चोरीच्या घटनांना विराम मिळत नसुन 18 रोजी दुपारी 12.30 ते 1 वाजेच्या सुमारास भंगार बाजारात अल्पवयीन मुलांकडून 1 हजार रुपये लुटून भामट्यांनी पळ काढला असल्याचीर घटना घडली आहे.
शेख मोईन शेख रईस रा.नशिराबाद व त्याचा नातेवाई शेख गुलाम शेख नबी (वय 17) रा. शालीमार हॉटेल जवळ नशिराबाद हे 18 रोजी भंगार बाजारात जुना मोबाईल खरेदी करण्यासाठी आले होते.भंगार बाजारात काही युवकांनी त्यांना गाठून जुना मोबाईल देतो असे सांगुन त्यांच्या जवळून 1 हजार रुपये काढून घेतले. मोबाईल न देता खराब व बंद पडलेला मोबाईल अंगावर फेकुन तीघ भामट्यांनी दुचाकीवर पळ काढला. याबाबत दोन्ही पिडीतांनी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले. परंतु उशिरा पर्यंत पोलीसात तक्रार नव्हती.