पुणे । शेलपिपंळगाव येथून 17 वर्षीय युवतीचे अपहरण करण्यात आले आहे. याप्रकरणी येथील पोलिसांनी शुक्रवारी अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव व पोलिस हवालदार अनिल ढेकणे यांनी दिली. सदर मुलीचे वडील दत्तात्रय चौधरी यांनी याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
गुरुवारी पहाटे दीड वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने खोटे आमिष दाखवून तिचे अपहरण केले आहे. पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अनिल ढेकणे व त्यांचे सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.