यावल : यावल तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात गुन्हा
यावल तालुक्यातील एका गावातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रविवार, 8 मे रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळूवन नेले. अल्पवयीन मुलीचा नातेवाईक व मैत्रिणींकडे शोध घेवूनही ती कुठेही आढळून आली नाही. रविवारी रात्री आठ वाजता यावल पोलिस ठाण्यात कुटुंबियांनी धाव घेवून कुणीतरी अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी करीत आहे.