नंदुरबार-13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तीन तरुणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की धडगाव तालुक्यातील पाडली येथील 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्यात आले. या दरम्यान खर्डागाव, वरखेडीचा उतारपाडा या ठिकाणी तसेच पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे मुलीला डांबून ठेवत तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. ही घटना दिनांक 19 ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबर दरम्यान घडली आहे. याबाबत पिडीत अल्पवयीन मुलीने धडगाव पोलीस ठाण्यात जाऊन स्वतः फिर्याद दिली आहे. त्यानुसार अर्जुन भायजा वळवी, जोसा विनोद वळवी, विनोद विजया वळवी राहणार खर्डा तालुका धडगाव या तिघांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.