फैजपूर : भुसावळ येथील अल्पवयीन तरुणी मित्रासह फिरण्यास गेली असता दोन तरुणांनी बंदूकीचा धाक दाखवून बलात्कार केल्याची घटना अकुलद शिवारात पिळोदा रस्त्यालगत रविवार 1 रोजी 6 वाजेच्या सुमारास घडली. यासंदर्भात अप्पर पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी घटनास्थळी पाहणी करुन प्रेमीयुगलाची चौकशी केली.
मित्रासोबत फिरण्यास गेल्यानंतर झाला घात
भुसावळ शहरातील फिल्टर हाऊस रोडजवळील रहिवासी अल्पवयीन तरुणी आपल्या तरुण मित्रासह 1 रोजी संध्याकाळच्या सुमारास फिरण्यास गेली असता ते अकलुद शिवारात पिळोदा रोडलगत मोटारसायकल लावून बोलत असताना दोन तरुणांनी अचानकपणे येऊन तरुणीच्या कानाजवळ बंदूक लावून तीला जबरीने मोकळ्या जागी काटेरी झुडूपांत ओढून बलात्कार करुन खिशातील 2 हजार 60 रुपये व तिच्या मित्राचा सहा हजार रुपयांचा मोबाईल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत पिडीत तरुणीने फैजपूर पोलीसात फिर्याद दिली असून दोन अनोळखी तरुणांविरुध्द बालकांच्या लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षक कायद्यासह, शस्त्र बाळगणी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात अप्पर पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी तापी नदी पलिकडील पोद्दार शाळेच्या परिसरात पाहणी केली. एपीआय सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मनोहर मोरे, पोहेकॉ. महेंद्र पाटील, पीएसआय साठे, पोहेकॉ. ममता तडवी, पोलिस नाइक विकास कोल्हे, उमेश पाटील, अर्जुन सोनवणे तपास करीत आहे.
भुसावळभोवती अनेक ‘डेंजर स्पॉट’
भुसावळ शहरातील अनेक तरूण-तरूणी तापी नदीच्या दोन्ही काठांवरील भागात फिरायला जात असतात. तेथे अनेक टवळखोरांचा वावर असतो. विशेष करून जुगादेवीचा परिसर, नदीपलीकडे टोल नाक्यापासून ते अंजाळे गावापर्यंत तर अकलूद ते दुसखेडा गावांच्या दरम्यान गावगुंड युगलांना त्रास देत असल्याच्या घटना घडत असतात. यातच या प्रकरणात तर गुन्हेगरांकडे बंदूक असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे पोलिसांनी या गुंडांचा बिमोड करावा अशी मागणी होत आहे.