अल्पवयीन मुलीशी लग्न लावून देण्यास नकार : पित्याचा खून

0

धडगाव तालुक्यातील गोरंबा गावातील घटना

नंदुरबार :– अल्पवयीन मुलीशी लग्न लावून देण्यास नकार देणाऱ्या पित्यास ठार मारल्याची घटना धडगाव तालुक्यातील गोरंबा गावात घडली. पोलिस सूत्रांनी दिलेली माहीती अशी की, आटा इरमा वळवी (वय 45) यांच्या 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी लग्न लावून दे , अशी मागणी जितेंद्र इन्द्या वळवी याने केली परंतु मुलगी अल्पवयीन असल्याने लग्नास तिच्या वडिलांनी नकार दिला.

याचा राग येवून जितेंद्र वळवी याने आटा वळवी याच्या डोक्यात दगड मारून रक्तबंबाळ केलं. यात त्याचा मृत्यू झाला. यावेळी जितेंद्र वळवी यांच्या भावांनी धुमाकूळ घालत दहशत पसरविली, अशी फिर्याद हुणारी आटा नाईक यांनी धडगाव पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार जितेंद्र इन्द्या वळवी, इन्द्या बेहड्या वळवी, ठाबड्या इन्द्या वळवी, मोहन इन्द्या वळवी, आमट्या इन्द्या वळवी, बुध्या इन्द्या वळवी यांच्या विरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.