भुसावळ । तालुक्यातील बोहर्डी बु. येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता तिसरीतील 9 वर्षीय विद्यार्थीनीवर शाळेतील नराधम शिक्षकानेच अत्याचार केल्याची घटना उघड झाल्याने परीसरात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. गणेश चुडामण कोलते असे अत्याचार करणार्या संशयीत आरोपी शिक्षकाचे नाव आहे. पिडीत विद्यार्थीनीच्या तक्रारीनुसार आरोपीने 11 नोव्हेंबर रोजी व यापुर्वी अनेकवेळा अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आरोपी शिक्षकाला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी करीत आहे.