प्रभाकर सोनवणे: रावेर पालिकेत सेवानिवृत्तीनिमित्त निरोप
रावेर: शहरात मुख्याधिकारी म्हणून अल्प कालावधी मिळाला मात्र या कालावधीतही अनेक विषयांना प्राधान्य देऊन ते मार्गी लागले. किमान दोन ते तीन वर्ष आपणास मिळाले असतेतर आणखी अनेक समस्यांचे निराकरण करता आले असते, असे भावनाविवश उद्गार मुख्याधिकारी प्रभाकर सोनवणे यांनी काढले. गुरुवारी सेवानिवृत्तीनिमित्त त्यांना पालिकेतर्फे निरोप देण्यात आला. प्रसंगी नगराध्यक्ष दारा मोहम्मद, उपनगराध्यक्ष रंजना गजरे, नगरसेवक आसीफ मोहम्मद, अॅड.सुरज चौधरी, राजेंद्र महाजन, प्रल्हाद महाजन, यशवंत दलाल, भुसावळ पालिकेचे मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर, भास्कर महाजन, हरीष गनवानी, रमेश महाजन यांच्यासह रावेर, सावदा नगरपालिकेखे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.