अल्प फीमध्ये चांगल्या प्रतीचे शिक्षण देणार- बालवडकर

0

सनराईज इंटरनॅशनल स्कुलचे दिमाखदार उद्घाटन

कासारसाई- शहरामध्ये मोठ्या नामांकीत शाळा व कॉलेजेस भरपुर आहेत, पण ग्रामीण भागात तशी काही सोय नाही. ग्रामीण भागातील गरीब जनता पैश्यांअभावी आपल्या लेकरांना उच्च प्रतीचे शिक्षण देऊ शकत नाही. ही गरज ओळखुन गरीबांना अल्प फीमध्ये चांगल्या प्रतीचे शिक्षण देण्यासाठी संस्थेची उभारणी केली आहे. या संस्थेत शिक्षणाबरोबरच आंतरराष्ट्रीयप्रतीचे क्रीडा प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे. यासाठी उच्च शिक्षीत स्टाफ व मॅनेजमेंटची नियुक्ती करण्यात आली असल्याचे, सनराईज इंटरनॅशनल स्कुलचे सचिव संभाजी बालवडकर यांनी सांगितले.

नृत्य सादरीकरण 

मुळशीच्या निसर्गरम्य ग्रामीण भागात सनराईज इंटरनॅशनल स्कुलचे नुकतेच उद्घाटन केले. त्याप्रसंगी बालवडकर बोलत होते. संचालक व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. ओमकार कला मंडलमच्या विद्यार्थिनींनी भरतनाट्यम् व विविध नृत्यांद्वारे उपस्थितांची मने जिंकली. नृत्य प्रशिक्षक गीता नायर यांनी या नृत्यांची आखणी केली होती.

या कार्यक्रमाला जि.प.सदस्य शंकर मेंढेकर, नगरसेवक अमोल बालवडकर, सभापती गुलाबराव माळसकर, मुळशी पंचायत समिती सभापती कोमल साखरे बुचडे, हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अरुण वायकर, पंचायत समिती सदस्या निकीता घोटकुले, प्राथमिक शिक्षण विभागाचे सह संचालक दिनकर टेमकर, पुणे विभागाच्या मिनाक्षी राऊत, मुळशी पंचायत समिती उपाध्यक्ष पांडा ओझरकर, मावळ पंचायत समिती उपाध्यक्ष शांताराम कदम, फिनीक्सचे संचालक शरद बालवडकर व माण, मारुंजी, जामखेड, हिंजवडी, नेरे व आसपासच्या गावातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.

अजिंक्य बालवडकरचा विशेष सत्कार
यावेळी शिक्षण क्षेत्रात 25 वर्षे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सनराईज इंटरनॅशनल स्कुलच्या राजन नायर यांचा उपस्थित पाहुण्यांच्याहस्ते शाल, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू अजिंक्य बालवडकर यांचा देखील सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थित सर्व पाहुण्यांचा पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन एंजल नायर यांनी केले. ख्रिस्ती समाजाच्यावतीने अनिता नायडू, बन्यामीन काळे, रुपसिंग, डेव्हिड काळे, पुजा नायडू आदी उपस्थित होते.