अवकाशात दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

0

नवी दिल्ली-भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने आज बुधवारी संध्याकाळी सीएसएमव्ही-एलके-III-D2 या प्रक्षेपकाद्वारे GSAT-29 या दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. जीएसएलएव्हीने संध्याकाळी ५.०८ मिनिटांनी जीसॅट-२९ उपग्रहासह अवकाशाच्या दिशेने उड्डाण केले.

आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन हे प्रक्षेपण झाले. जीसॅट-२९ला अवकाश कक्षेत सोडल्यानंतर इस्त्रोने मोहिम पूर्ण झाल्याचे टि्वट केले.