अवघ्या तीन वर्षात वर्ल्ड रेकॉर्ड

0

पालघर – डहाणू (आशागड) येथील प्राथमिक शिक्षक दिलीप कलाप्पा चिलबिले यांचा मुलगा स्वराज याने अवघ्या तीन वर्षात फक्त 25 सेकंदात राष्ट्रगीत म्हटल आहे. त्यामुळे स्वराज स्वत:च्या स्मरण शक्तीच्या जोरावर इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड या जगभरातील भारतीयांचे रेकॉर्ड नोंदवणार्‍या संस्थेत आपल्या नावावर एक रेकॉर्ड नोंदवण्याचा पराक्रम केला आहे.

स्वराने आपल्या पाठांतर क्षमतेच्या जोरावर ठशलळींरींळेप ेष छरींळेपरश्र -पींहशा या विक्रमाची नोंद केली आहे. त्याचे मेडल, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र पालघरचे आमदार अमित कृष्णा घोडा यांच्या हस्ते देण्यात आले. स्वराजच्या या कामगिरीबद्दल आमदार घोडा यांनी स्वराज आणि त्याच्या आईवडिलांचे कौतुक केले आहे. तसेच त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. फक्त आमदारांकडूनच नाही तर स्वराजच्या स्मरणशक्तीचे संपूर्ण पालघर जिल्ह्यातून कौतुक होत आहे.