जळगाव : अवजड वाहतूकीस बंदी असतांना देखील रामानंदनगर परिसरातून मोठ्या प्रमाणावर अवैध व अवजड वाहतूक करणार्या तीन वाहनांवर आज रामानंदनगर पोलिसांनी मंगळवारी दंडात्मक करवाई केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रामानंद नगर परिसरातून अवजड वाहतूक होत असल्याची तक्रार नगरसेवक व नागरिकांची तक्रार होती. यापुर्वीही गेल्या आठवड्यात तीन ट्रॅक्टरासह एक डंपरवर दंडात्मक करावाई केली होती. रामानंदनगर परिसरातून हरिविठ्ठलनगर घाटातून अवजड वाहनांना वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील नियम मोडून वाळू वाहतूक करणारे डंपर व ट्रॅक्टर धावतात. अजवड वाहतूकीस बंदी असतांना गेल्या बुधवारी दोन दुचाकींच्या धडकेमुळे रस्त्यावर पडलेल्या बलवीर पाशा या दुचाकीस्वाराच्या हातावरून डंपरचे चाक गेल्याने हाताला व पोटाला जबर दुखापत झाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.
तीनही वाहने पोलिसात जप्त
हरीविठ्ठलनगर परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असल्यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांची याच रस्त्यावरून सकाळपासून ते सायंकाळपर्यंत वर्दळ असते. शिवाय शाळा व महाविद्यालय या भागापासून जवळ असल्याने छोट्या मोठ्या वाहनांवरून विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याने अवजड वाहतूकीमुळे विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत घेवून प्रवास करत आहे. गेल्या आठवड्यातीत चार वाहनांवर कारवाई केल्यानंतर मंगळवार 27 मार्च रोजी याच परिसरात अवजड वाहतूक करणार्या अजून तीन वाहनांवर सकाळी 7 वाजेच्या सुमारास रामानंदनगर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यात इनसान हेमा भिल (वय-25) रा. वैजनाथ ता.जि.जळगाव याच्या ताब्यातील ट्रॅक्टर क्र.(एमएच 19 बीजे 4339) व ट्रॉली क्र. (एमएच 19 बीक्यू 1558), राहूल एकनाथ भोई (वय-22)रा. भाईनगर जळगाव यांच्या ताब्यातील डंपर क्र. एमएच 19 झेड 3636 तर युवराज बाबुराव कोळी (वय-27) याच्या ताब्यातील बोअरवेल करण्याचे वाहन ट्रक क्र. (केए 01 एमएन 8292) या तीन वाहनचालकांसह वाहने रामानंदनगर पोलिसात जप्त करण्यात आले आहे.