चिंबळीफाटा ते मोशी तीन किलोमीटर रांगा
चिंबळी : पुणे- नाशिक महामार्गावर मोशी ते चिंबळी फाटा पर्यंत सोमवारी दुपारच्या सुमारास अवजड वाहने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. यामुळे सुमारे दोन तास महामार्गावरील वाहतुक खोळंबली होती.
मोशी,भोसरी, चाकणकडे जाणार्या मार्गावर वाहतुक पोलिसांनी घालून दिलेल्या वाहतुक नियमांचे उल्लंघन करत बेशिस्त पणे विरोधी दिशेने वाहने घुसविल्याने देहु रस्ता चौकात दोन तास वाहतुक कोंडी झाली. यामुळे पुण्याच्या दिशेला जुना जकात नाका बोराडे वाडी पर्यंत तर आळंदी रस्त्यावर आल्हाट वाडी,चाकण रस्त्यावर चिंबळी फाटयापर्यंत तर देहु कडे तळवडे पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. एक ते दोन वाहनांमुळे वाहतुक खोळंबली असताना इतर वाहन चालकांनी आपल्या बेशिस्तीचे दर्शन घडवत विरोधी दिशेने वाहने घुसविल्याने दोन तास वाहतुक कोंडी होण्याची परस्थिती ओढावली. दरम्यान या वाहतुक कोंडीला पूर्वरत करताना वाहतुक पोलिसांची पुरती दमछाक झाली.