जळगाव । शहरात अवयव दान, बेटी बचाओ-बेटी पढाओ, पाणी अडवा-पाणी जिरवा, झाडे लावा-झाडे जगवा, प्लॉटीक हटाव-दुनिया बचाव, सायकल चालवा-इंधन वाचवा अश्या विविध समाजपयोगी व पर्यावरणपुरक जनजागृती तसेच महाराष्ट्रातील अनेक धार्मिक स्थळे बघणे रस्त्यात येणार्या अनेक शाळा, पोलिस स्टेशन यांना भेटी देवुन वरील विषयी जनजागृती व सामाजिक प्रबोधन करणेकामी सुमारे 3000 कि.मी. चालणार्या या नाशिक येथुन सुरु झालेल्या सायकल रॅलीचे महापौर ललित कोल्हे यांनी स्वागत केले.
3 हजार किमी यात्रा करणार 20 दिवसांत पूर्ण
याप्रसंगी सायकल रॅली सदस्यांंकडून अवयवदानाबाबत माहिती देण्यात येवून महापौरांना अवयवदान होत असलेल्या हॉस्पीटलची माहिती दिली.या सायकल रॅली सहभागी सदस्य रत्ना ठकोबा डोंगरे, विनायक श्रीपत कातकाडे, माधव ठकोबा डोंगरे, ताराचंद ठकोबा डोंगरे, पुनम माधव डोंगरे, किरण ताराचंद डोंगरे, योगेश गंगाराम डोंगरे, दिनेश रामभाऊ सांगळे, अंकुशा कैलास सांगळे, वेदांत माधव डोंगरे व सुरेश ठकोबा डोंगरे असे एकुण 11 सदस्यांची असुन ते सायकलिंगव्दारे नाशिक येथुन आज रोजी जळगाव दाखल झालेत. ही रॅली शेगांव, यवतमाळ, तुळजापुर, कोल्हापुर,चिपळूण, रायगड,मुंबई, ठाणे मार्गे घोटी नाघिाक येथे किमान 3000 कि.मी. पेक्षा जास्त प्रवास किमान 20 दिवसात पुर्ण करण्याचे उद्दीष्ट्य आहे. या स्वागतप्रसंगी महापौर कोल्हे यांच्यासह शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.