अवैधरीत्या दारू विक्री : एकाला तालुका पोलिसांनी केली अटक

0

भुसावळ : अवैधरीत्या दारूची विक्री करताना गणेश जनार्दन मंडलीक (खडका) यास भुसावळ तालुका पोलिसांनी गस्तीदरम्यान खडका-किन्ही रस्त्यावरील इंदिरा नगर भागातून मंगळवारी अटक केली. आरोपीविरुद्ध भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या ताब्यातून टँंगो पंच देशी दारूच्या 180 एम.एल. च्या 48 बाटल्या तसेच 90 एम.एल. च्या 48 बाटल्या मिळून तीन हजार 744 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, हवालदार शामकुमार मोरे, हवालदार विठ्ठल फुसे, नाईक प्रेमचंद सपकाळे यांनी केली.