धुळे । ट्रकमध्ये निर्दयतेने कोंबलेल्या गोर्हे आणि बैलांची अप्पर पोलिस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने सुटका केली आहे. मुंबई आग्रा महामार्गावर एम.एच.18 ए.सी.6383 क्रमांकाच्या आयशर गाडीमध्ये निर्दयतेने गुर्हे कोंबून नेले जाणार असल्याची गुप्त माहिती अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पानसरे यांना मिळाली होती. या माहितीवरुन पानसरे यांनी सदर वाहन अडवून योग्य ती कारवाई करा असे आदेश फोनद्वारे पीएसआय भास्कर शिंदे यांना दिली.
मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल
आदेशाची अंमलबजावणी करत पीएसआय शिंदे यांनी पो.कॉ.प्रदिप सोनवणे, नितीन पाटील, मुकेश जाधव, समिर पाटील यांना सोबत घेत आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास वडजाई रोडवरील पुलाजवळ त्यांना सदरची गाडी थांबलेली दिसली. गाडीचालक हा गाडी सोडून निघून गेलेला होता. गाडीजवळ कुणीही नसल्याने पोलिस पथकातील पोलिसांनी आयशर गाडीची ताडपत्री उघडून पाहिली. त्यावेळी त्यांना गोर्हे आणि बैल यांचे हातपाय तोंड बांधून निर्दयतेने कोंबलेले आढळून आले. पोलिसांनी आयशर गोर्हे आणि बैल असा 9 लाख 40 हजाराचा माल जप्त केला आहे. फरार गाडीचालकाविरुध्द मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे