अवैध गुरांची वाहतुक करणारे वाहन जप्त , गुरांची गोशाळेत रवानगी

0

शिरपुर – श्रीराम सेना,शिवसेना,समता परिषदेचे कार्यकर्ते आणि पोलिसांनी पाठलाग करून रात्रीच्रा सूमारास आयशर गाडी पकडली. या वाहनात सूमारे 9 लाख रूपये किंमतीचे 56गोर्‍हे आढळून आले.या गोर्‍हरांना धुळे शहरापासून जवळच असलेल्या मोराणे येथील व्दारकाधिश प्रतिष्ठानच्या गोआश्रमात दाखल करण्यात आले आहे. आयशर चालक आणि सहचालक गाडी सोडून पसार झाले आहेत. चोपडराकडून शहराकडे गोवंश भरून एम.एच.18 बी.ए.9287 क्रमांकाचा ट्रक जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेचे शिरपूर येथील शहरपमुख मनोज धनगर, तालुकाप्रमुख भरत राजपुत,समता परिषदेचे पिंटू माळी, श्रीराम सेना संघटनेचे तुषार बारी,बंटी लांडगे,अनंत पाटील,दिनेश चौधरी यांंनी या गाडीचा पाठलाग सुरू केला.या गाडीबाबतची माहिती शिरपूर पोलिसांनाही मिळाली.त्यामुळे पीआय संजय सानप यांच्या शोध पथकानेही गाडीचा पाठलाग केला. या वाहनाला वाघाडी ता.शिरपूर गावच्या शिवारातील पेट्रोल पंपाजवळ पकडले. वाहनाचा पाठलाग करत असल्याचे गाडी चालकाच्या लक्षात आल्यानंतर पेटृ्रालोल पंपाजवळ गाडी सोडून ते पळाले. रात्रीच्या सूमारास पोलिसांनी ही कारवाई केली. या गाडीमध़्ये 8 लाख 80 हजार रूपये किंमतीचे 56 गोर्‍हे आढळून आलेत. दाटीवाटीने वाहनात गोर्‍हे भरलेले असल्यामुळे 56 पैकी 9 गोर्‍हयाचा मृत्यु झाला आहे. गोर्‍हयांना जवळील गोआश्रमात दाखल करण्यात आले आहे.