अवैध दारूच्या भट्ट्यांवर नवापूर पोलिसांची कारवाई

0

नवापूर । नवापूर शहरातील देवळफळी भागात रंगावली नदी किनारी मंगळवारी नवापूरचे पोलिसांनी अवैध दारूच्या भट्टीवर कारवाई केली. या कारवाईने अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. नवापूरचे पोलीस निरीक्षक रामदास पाटील, सहायक पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, संगिता कदम, बी. बी. सुर्यवंशी यांनी दारुचा हातभट्टीवर छापा मारून सुमारे 41 हजार 100 रुपयाची मोहफुल पकडले.

आरोपींनी काढला नदीच्या मार्गाने पळ
यात 200 लिटरचे 6 प्लास्टिक ड्रम, एका प्रत्येकी ड्रम मध्ये 200 लिटर अशी सर्व सामग्री मिळुन 41 हजार 100 रुपयांचा माल जप्त केला आहे. सकाळी 12:15 वाजता पोलिसांनी ही कार्यवाही केली. यावेळी आरोपी पोलीस वाहन येत असल्याचे पाहुन नदीच्या मार्गाने पळ काढण्यात यशस्वी झाले. ही कार्यवाही पोलीस निरीक्षक रामदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, संगिता कदम, बी. बी. सुर्यवंशी, पो.का.निजाम पाडवी, कृष्णा पवार, योगेश थोरात, गिरधर सोनवणे, रितेश हिंदवे, दिलीप चौरे, हिरालाल सोनवणे, कवीता पाटील,चालक महेश पवार यांनी केली.

आरोपींची निर्दोष मुक्तता
नवापूर : घोघलपाडा गावात सरपंच निवडीची निवडणुकीच्या वेळी झालेल्या मारहाण प्रकरणातील आरोपींची नवापूर येथील मे.न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग यांच्या न्यायालयातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत असे की आरोपी गणेश प्रधान, मनोज प्रधान, ईमा प्रधान, लक्ष्मन प्रधान यांच्या विरोधात खांडबारा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्हयाचे कामकाज नवापूर न्यायालयात चालु होते. आरोपी घोघलपाडा.ता नवापुर येथील राहणारे आहेत. सदर हकीकत अशी की घोघलपाडा गावात सरपंच निवडीची निवडणुक होती. फिर्यादी व आरोपी या दोन्ही पक्षात मारामारी झाली होती. त्यात सदर आरोपी यांना अटक करण्यात आली होती. सरकार पक्षातर्फे या केस मधे एकुण 5 साक्षीदारांची जबानी घेण्यात आली होती. आरोपी तर्फे अ‍ॅड.तुकाराम वसावे यांनी सर्व साक्षीदारांची उलट तपासणी घेतली.त्यातील सर्व चौकशी संपल्यानंतर सदर नवापूर येथील न्यायालयाचे न्यायाधीश करुणा राजपुत यांनी आरोपी यांना निर्दोष घोषित केले.